दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी भंडारा-संभाजी गोसावी
जिल्ह्यांमध्ये पीडित बलात्कार प्रकरणी लाखनी पोलीस प्रकरणात भंडारा जिल्ह्यांचे नूतन पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी २ पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले.यामध्ये पीएसआय दिलीप खरडे आणि एपीआय लखन उईके अशी निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. यापूर्वी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्याकडूंन या प्रकरणाची चौकशी सुरु होती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्यांचे स्पष्ट संकेत नूतन पोलीस अधीक्षक श्री.मतांनी यांनी दिले गोरेगांव येथे पीडित महिलेवर बलात्कार झाल्यानंतर पीडित महिला लाखनी पोलीस स्टेशनला आली होती. तिच्या तक्रारीकडे वेळेत लक्ष न दिल्यांमुळे दुसरा झालेला बलात्कार टाळता आला असा आरोप शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केला होता यात लाखनी पोलिसांची अक्षम्य चूक समोर आली. आणि लाखनी पोलिसांवर टीका होऊ लागली त्यानंतर स्वता नूतन पोलीस अधीक्षकांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षांत घेताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्याकडे या तपासाची जबाबदारी सोपवली