दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
बारामती – धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि तेव्हापासून स्विकारलेल्या आणि महाऱाष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नसल्याची भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मांडली.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना दुसरा पक्ष काढायचा असेल तर ते जरुर काढू शकतात, दुसरे चिन्हही ते घेऊ शकतात, मी देखील कॉंग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा आम्ही नवीन पक्ष स्थापन केला, घड्याळ हे चिन्ह घेतले, आम्ही वाद वाढवला नाही, पण धनुष्यबाणाबाबत काही ना काही काढून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोकच त्याला पाठिंबा देणार नाहीत.