दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालन्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना महिलेने अडवल्याचा प्रकार घडला. अॅड. रिमा खरात काळे असे या महिलेचे नाव आहे. शहरात एका दाम्पत्याचे स्टेशनरीचे दुकान होते. ते दुकान रिकामे करण्यासाठी घर मालकाने पोलिसांना सुपारी दिली आणि दुकानातला 15 लाखांचा माल परस्पर पोलिसांनी लंपास केला, असा आरोप महिलेने केला आहे.
जालना जालन्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना महिलेने अडवल्याचा प्रकार घडला. अॅड. रिमा खरात काळे असे या महिलेचे नाव आहे. शहरात एका दाम्पत्याचे स्टेशनरीचे दुकान होते. भाड्याने घेतलेले हे दुकान रिकामे करण्यासाठी घर मालकाने पोलिसांना सुपारी दिली आणि दुकानातला 15 लाखांचा माल परस्पर पोलिसांनी लंपास केला, असा आरोप महिलेने केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनी हा सगळा प्रकार केला असल्याचा महिलेचा आरोप आहे. या प्रकरणात या महिलेने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना अडवले. दरम्यान या प्रकरणात चौकशी करण्यात येईल, असे सत्तार यांनी म्हटले आहे.