दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार तालुका ग्रामीण -बाजीराव गायकवाड
कंधार:- महाराष्ट्र राज्यातील विविध मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मा.ना.दिपक केसरकर साहेब यांना राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली व मा.ना.दिपक केसरकर साहेब यांना महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री पदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांच्या हस्ते निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.प्रियदर्शनी शिक्षण संस्था कळका ता.कंधार जि.नांदेडचे अध्यक्ष अॅड.विनायकराव इरवंतराव कदम यांनी मा.ना.दिपक केसरकर साहेबांना
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.