दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार:- मनोविकास विद्यालय कंधार येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला थोर नेते थोर संत यांच्या वेशभूषा करून पुष्कळ विद्यार्थी प्रभात फेरीमध्ये सामील झाले शाळेचे अध्यक्ष फुलकुंडवार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मुखेडकर साहेब कोषाध्यक्ष विकास बिडवई साहेब मुख्याध्यापिका पतंगे मॅडम व उपमुख्यापक बंडेवार सर, पर्वेक्षक पुलकुंडवार सर, बाळासाहेब पवार सर,तेलंगे सर,मोरे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच पुलकुंडवार साहेब व मुखेडकर साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले मुखेडकर साहेब व सहकारी शिक्षक चंद्रकांत मामडे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला संपूर्ण कंधार शहरांमध्ये विद्यार्थ्यांची रॅली काढून नगरपालिका कंधार चा ध्वजारोहण व तहसील कार्यालयाचा ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सांगता झाली याप्रसंगी सर्व शिक्षकांनी पुष्कळ मेहनत करून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्कृष्टपणे साजरा केला.