दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
पैठण तालुक्यातील राहटगाव येथे काही दरोडेखोरांनी दगडफेक करून ट्रक चालकांना लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली . मात्र चोरच पोलिसांचा खेळ. पुढे दरोडखोरांची गाडी आणि मागून पोलिसांची एक चारचाकी-दुचाकीने पाठलाग सुरु झाला
• मध्यरात्री सुरु झालेला हा थरार तब्बल अर्धा तास चालल्यावर पैठण पोलिसांनी दरोडेखोरांच्या गाडीला घेरावा घालत अखेर त्यांना ताब्यात घेतले. सोमनाथ दादासाहेब नरवडे ( वय 20 वर्ष, रा. घोटण, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) आणि स्वप्नील मारोती दराडे (वय 19 वर्ष, रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर ) असे आरोपींचे नावं आहेत .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन पैठण हद्दीमध्ये रात्रीच्या साडेबारा वाजेच्या सुमारास कर्नाटक राज्यातून कोपरगाव व नाशिक येथे माल वाहतुक करणारा ट्रकला एका बोलेरो वाहनातील दोन इसमांनी रहाटगाव फाटा येथे अडवले. ट्रक चालक व वाहकाला तलवारीचा धाक दाखवुन त्यांना चापटबुक्क्याने लाथाने मारहाण करुन त्यांच्याकडील 1400 रुपये बळजबरीने काढुन घेतले. या घटनेची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांचा स्टाफ घटनास्थळाकडे रवाना झाला. मात्र त्याचवेळी आरोपी सुद्धा पैठणकडे येत असल्याची माहिती पवार यांना मिळाली. ट्रक चालकांना लुटणारे पैठणकडे येत असल्याची माहिती मिळताच पवार यांनी आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहून आरोपींनी गाडी पैठण शहाराकडे वळवली. मग पुढे दरोडेखोर मागे पोलीस असा खेळ सुरु झाला. याचवेळी शहरात दुचाकीवरून पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांकडून सुद्धा आरोपींच्या गाडीचा पाठलाग सुरु झाला. त्यांनतर अर्ध्या तासांनी पोलिसांनी आरोपींना अखेर अडवून ताब्यात घेतले.