दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे प्रथमच मियावाकी प्रकल्प उभारण्यात येत असून अंजनगाव सुर्जी येथील नागरिकांना वन्य औषोधोपयोगी वृक्ष,निसर्गरम्य पर्यावरण तसेच ऑक्सिजनचा या मियावाकी प्रकल्पापासून लाभ मिळणार आहे.अमृत महोत्सवा निमित्ताने अंजनगाव सुर्जी चे कर्तव्यदक्ष तहसीलदार अभिजीतजी जगताप यांनी भेट दिली.त्यांनी नागरिकांना यावेळी मियावाकी प्रकल्पापासून आरोग्यदायी संदेश दिला.
या वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान श्रीमती वासंतीताई मंगरोळे,लोकजागर संघटना,पतंजली तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.