दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
मराठा सेवा संघ व सकल मराठा आयोजित शोकसभेत, सर्व पक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
अत्यंत कष्टाने संघर्षातून पुढे आलेले विनायक मेटे यांचे अपघाती निधन म्हणजे मराठा समाजासाठी फार मोठी पोकळी निर्माण करणारी घटना आहे.छत्रपती शिवरायांचा अरबी समुद्रातील पुतळा,एक मराठा लाख मराठा,मराठा आरक्षण लढ्यात मोठे योगदान असून विनायक मेटे यांच्या अकाली निधनाने मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले असल्याचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली.
तसेच लोहा येथील अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे व प्रतिमेस पुष्प अर्पण करत जड अंतःकरणाने आदरांजली वाहिली.
शहरातील व्यंकटेश गार्डन येथे विनायक मेटे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ व सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला.यावेळी माजी आमदार रोहिदास चव्हाण, उपनगराध्यक्ष दत्ताभाऊ वाले,माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक केशराव मुकदम,ऋषिकेश जोगदंड,बापू गायकर,शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, हरिभाऊ चव्हाण,बी.वाय.चव्हाण,विठू भाऊ चव्हाण, बाळासाहेब जाधव,प्रदीपकुमार कांबळे,मुख्याध्यापक दामोदर वडजे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्याम नळगे,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शिवराज पवार, श्याम आण्णा पवार,ज्ञानोबा पवार, नागेश हिलाल,भीमराव शिंदे, माऊली पवार,सचिन कल्याणकर,संग्राम डिकळे, योगेश कदम,सुलतान शेख, मुकुल पवार ,युवराज शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.