दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :- राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची 126 वी जयंती शहरातील नागरगोजे यांच्या निवासस्थानी करण्यात आली. राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.परंपरेनुसार दरवर्षी भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान भूम तालुका यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येतो.यात तालुक्यातील समाज बांधव यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते भगवान बांगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बालाजी कुठे, सभापती नामदेव नागरगोजे, डॉ अमोल कुटे, शिक्षक धनंजय आंधळे, शिवसेनेचे नेते महादेव कुटे, मनसेचे नेते नवनाथ कुटे,एसटी महामंडळाच्या कर्मचारी हनुमंत नागरगोजे, प्राथमिक शिक्षक बालाजी कुटे, डॉ.अविनाश हांगे, अंगद कुटे,ग्रामसेवक मुंडे, जाधवर सर, श्रीमान बोत्रे साहेब व इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमा त आयोजन भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान भूम तालुका यांच्यावतीने करण्यात आले. जयंती साजरी केल्यानंतर सर्वांचे आभार भारतीय जनता पार्टीचे नेते व समाजसेवक भगवान बांगर यांनी मानले .