दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम;-राष्ट्रीय योजना व दिव्यांगाना सहाय्यक उपकरणे योजनेअंतर्गत उपकरण वाटपासाठी तपासणी शिबिर पंचायत समिती व भारतीय जनता पार्टीचे सहकार्याने घेण्यात आले , या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला, लाभधारकांनी कागदपत्राची पूर्तता करूनच लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार उषा किरण रंगारे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
बुधवार दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री आ . राणा जगजितसिंह पाटील व मा. आ .प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भूम येथे अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय दिव्यांग सशक्तिकरण विभागच्यावतीने एक दिवसाचे राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांगाना सहाय्यक उपकरणे निर्णय अंतर्गत उपकरण वाटपासाठी शिबिर घेण्यात आले.
या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांना ज्या उपकरणांची गरज आहे जसे की व्हीलचेअर, कुबडी , काठी, चष्मा, श्रवण यंत्र अशा साहित्याची आवश्यकता आहे अशांना तपासणी करून नोंदणी करून घेतली आहे.
याशिवाय ज्या दिव्यांगांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिलेले नाहीत, मिळालेले नाही, अशांची देखील तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्या संदर्भात कार्यवाही करण्यात आली, या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. विजयकुमार सुळ,. कोऑर्डिनेटर डॉ. डि. डि दाते. डॉ सय्यद परवीन, कॉर्डिनेटर तेरणा जनसेवा केंद्र उस्मानाबाद . तसेच अलीम को मुंबईचे डॉ. निंरज मोर्या, कृत्रिम अवयव तज्ञ डॉ. प्रिया वर्मा, डॉ. काजल खाडे, डॉ. राजेश भेंडे, डॉ. सर्जन भालेराव, डॉ. गुलशन गुप्ता, नेत्र टेक्निशियन विवेक कांबळे, शिवानंद पाटिल, युसुफ शेख यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भूमच्या
तहसीलदार उषा किरण शृंगारे, गट विकास अधिकारी भागवत ढवळशंख, विस्तार अधिकारी व्हि जे वाघमारे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख, माजी सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष महेबूब शेख. सरचिटणीस सचिन बारगजे, उपाध्यक्ष बाबासाहेब वीर, युवक तालुका सरचिटणीस सचिन मस्के, चंद्रकांत गवळी, भाजप जिल्हा दिवांग उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, गणेश पाटील, डॉ. अविनाश मोरे, सुभाष शिंदे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शंकर खामकर यांनी केले.