दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा थोडक्यांत परिचय ते २०१६ मधील आयएएस अधिकारी असून त्यांनी देश पातळीवर ३०६ वा क्रमांक पटकावला होता. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजवलेल्या सिंह यांची २०१८ मध्ये गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली होती तेथील प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शेखर सिंह यांच्याकडे सातारा जिल्ह्यांची जबाबदारी राज्य शासनांने सोपवली होती. मार्च २०२०२ मध्ये शेखर सिंह यांनी सातारा जिल्हाधिकारी म्हणून मावळते जिल्हाधिकारी श्रीमती सौ. श्वेता सिंगल यांच्याकडूंन पदभार स्वीकारला होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच कोरोना महामारीचे संकट जिल्ह्यांवर उभे राहिले होते. या महामारीत महसूल विभागांची यंत्रणा हाताशी घेवुन अत्यंत त्यांनी महामारीचा धैर्याने मुकाबला केला. जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्नं तसेच विविध विकास योजना, जंबो कोविड हॉस्पिटल, अतिदृष्टीग्रस्तांना भूस्खलन ग्रस्तांना मदत आदीं महत्त्वांच्या प्रसंगी त्यांनी स्वता पुढाकार घेऊन जनतेला जास्तीत जास्त मदत केली. सातारा शहरांची हद्दवाढ डीपीडीसी मधील निधी या संदर्भात विविध स्त्रोतांचे बळकटीकरण त्यांचे मंत्रालयांत सादरीकरण करणारे सातारा जिल्ह्यांचे उत्कृंष्ट जिल्हाधिकारी म्हणून शेखर सिंह यांचे चांगलीच ओळख होती. शेखर सिंह यांची कार्यपद्धती नेहमीच सातारा जिल्ह्यांसाठी वाखाणली ठरली. राज्यस्तंरावर त्यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक झाला होता. त्यांच्या या उत्कृंष्ट सातारा जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी ऐतिहासिक जिल्ह्यांची जबाबदारी चांगल्याच पद्धतीने आणि जबाबदारीने कर्तव्यदक्ष निभवली. आता शेखर सिंह हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तपदी त्यांची नव्या सरकारकडूंन नियुक्ती झाली असून शेखर सिंह हे गुरुवारी संध्याकाळी पुणे येथील आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारतील. शेखर सिंह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी आहेत.