दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
==================
भिगवण जिल्हापरिषद शाळा म्हणजे कोवळ्या मनाला कआकार देणारे ठिकाण आणि अश्या ठिकाणी मनाला आकार देण्याच्या ऐवजी त्या मनावर दुष्परिणार करणारे कृत्य.. जर हे असेच क्रुत्ये घङत असेल तर मुलाच्या भविष्याच काय होनार राजस्थान एका शिक्षकाने पाणी पिल्याच्या करना वरून जिवे मारले तसेंच बारामती येथील एका शिक्षकाने एका मुलिचा विनयभग केल्याचा प्रकार घङला आतापर्यंत हा तसेच भिगवण मधील ही घटना आहे .
हकीकत अशी की भिगवण मधील जिल्हापरिषद शाळे मध्ये दादासो खरात नावाचा पदवीधर शिक्षक आणि त्याच्याकडे सहावीच्या वर्गा आणि त्या वर्गातील मुलं व मुलींना तो जे शिकवत होता ते हे की दरवाज्याच्या आदबाजूला दारू पिऊन मुलींना जवळ बोलावून त्यांच्या नको त्या शरीराच्या भागाला हात लावून तू माझी आवडती आहेस आणि तू माझ्या जवळ बसत जा आणि सतत माझ्याकडे हासून पहात जा तू शाळेत आली नाहीस तर मला करमत नाही असे धडे देणारा हा नराधम शिक्षक त्याने काल केलेला कारनामा म्हणजे वर्गातील सर्व मुलांना बाहेर काडून एकाच विध्यार्थीनाला वर्गात घेऊन दार लावून घेऊन तिच्या हातावर बदामाचे म्हणजे प्रेमाचे प्रतील असणारे दिलाचे चित्र काडून त्या मध्ये R नावाचे इंग्रजी अक्षर काडून तिच्या कडे मोहक नजरेने हासून डोळ्याने इशारे करत राहिला .
हि सर्व हकीकत मुलीने आई वडिलांना सांगितल्या नंतर त्या शिक्षकाला जाब विचारण्या साठी पूर्ण ग्रामस्थ गेले तर मुख्यध्यापिका यांच्या कडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती त्या वर ” शिवसेना भिगवण शहर प्रमुख रामचंद्र पाचांगणे” यांनी तालुका शिक्षण अधिकारी व बी डी ओ यांना कॉल करून विचारणा केल्यानंतर मुख्याध्यापिका यांनी बोलण्यास सुरुवात केली शिवाय असाच प्रकार चार महिन्या पूर्वी याच शिक्षका कडून घडला होता तेंव्हा मुख्यध्यपिका यांनी त्या शिक्षका कडून माफीनामा लिहून घेतला होता . तो माफीनामा कुठे आहे असे विचारले असता तो ही त्यांच्या कडील फाईल मध्ये तो नव्हता या वरून हेच लक्षात येत होते की शाळा व शिक्षण अधिकाऱ्याची तालुका पर्यंत ची साखळी त्या शिक्षकाला पाठीशी घालून वेळ मारून नेण्याचा कारभार करू पाहत होती . शेवटी भिगवण पोलीस अधिकारी ऐ पी आय दिलीप पवार यांना बोलाविण्यात आले आणि मग त्यांनी मुख्याधिपिकाना त्यांचाच अधिकार काय असतो हे शिकविल्या नंतर कुठे त्यांचा मी पणा कमी झाला आणि मग मुख्याधिपिकानी शिक्षकाच्या चुका कबूल केले
लगेचच ऐ पी आय दिलीप पवार यांनी फिर्याद नोंदवून तात्काळ त्या आरोपीस बारामती मध्ये अटक केली आणि ग्रामस्थानची मने जिंकली
तदनंतर दुपारी चार वाजता तालुक्याचे शिक्षण अधिकारी खरात आले व त्यांनी सर्व ग्रामस्था समोर सांगितले की तात्काळ चौकशी करून त्या शिक्षकाला निलंबित करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करतो यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी मुख्याधिपिकानीची हाकालपट्टी करण्यात यावी हे पुन्हा इथे दिसता कामा नये अशीही मागणी करण्यात आली
आणि त्याच बरोबर ऐ पी आय पवार साहेबानी सांगितले की मी स्वतः लक्ष घालून कोर्टाला विनंती करून हे प्रकरण कोर्टात तात्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो .
अखेर शिवसेना पद्धतीने शिवसेना शहर प्रमुखांचे बोलणे व ग्रामस्थानची मागणी याला एकाच दिवसात त्या शिक्षकाला अटक करून त्याच्या काळ्या कारनाम्याला पूर्ण विराम देण्यात यश आले जमलेल्या कार्यकर्त्यांची नावे पढील प्रमाणे रामचंद्र पाचांगणे , शौकत पठाण, दत्ता कदम, फिरोज पठाण, दत्तात्रय पाचांगणे, महादेव सकुंडे , पिंटू शेलार, तानाजी वायसे, पराग जाधव, संजय देहाडे,अमितकुमार वाघ, दत्ता धवडे, तुषार सिरसागर, राजकुमार हगारे व अनेक ग्रामस्थ, व सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते…
या मध्ये सर्व पत्रकार बंधूंचे शिवसेने कडून मनापासून आभार मानण्यात आले.