दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरात आज दिनांक २० आॅगस्ट रोजी आझादी का अमृत महोत्सव व शिवा संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवा संघटना तालुका शाखा लोहा च्या वतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबविण्यात येतात यंदा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व शिवा संघटनेचे तरुण तडफदार कर्तव्यदक्ष लोहा तालुका अध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोहा शहरात आज दिनांक २० आॅगस्ट २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांचे उद्घाटन शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या हस्ते होणार असुन यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रक्तदान हेच जीवदान वाचवी रुग्णांचे प्राण या म्हणीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासत आज लोहा शहरात होणाऱ्या भव्य रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवा संघटना तालुका शाखा लोहा च्या वतीने करण्यात आले आहे.