दैनिक चालु वार्ता /
प्रतिनिधी सचिन मुगटकर/
नांदेड : हिमायतनगर शहरात दिवसा ढवळ्या यशचा निरघून खुन दि.११ सप्टेंबर रोजी झाला होता. त्याचा खुन करनाऱ्य आरोपीला एकुण तिघांना अटक केली आहे. परंतु या खुनात आनखी.काही जणाचा समावेश असल्याचा संशय यशच्या पित्या कडुन वारंवार केला जात होता .परंतु पोलिस प्रशासना कडून जाणीव पूर्वक राजकीय दबावाला बळी पडून तपास योग्य दिशेने होत नसल्याने अखेर दि.१६-०९ -२०२१ रोजी दुपारी १- २५ वाजता हिमायतनगर पोलिस स्टेशन वर विविध मागन्या घेऊन नातेवाईका सह सर्व पक्षीय कार्यकर्ते व समाज बांधवा कडून भव्य निषेध मुक मोर्चा नेन्यात आला होता. या वेळी संबंध हिमायतनगर, हंदगाव,उमरखेड येथून हजारो मराठा समाज बांधव यशच्या मारेकऱ्यांला अटक करून त्याना ताबडतोब फासावर दयावे व भविष्यात असे घटना पुढे घडणार नाही याची काळजी आई ,वडील शाळेतील शिक्षक वर्ग ,पोलीस प्रशासनाने ,सामाजिक कार्यकर्ते यांनी दक्षता घ्यावी, असे शोक सभेत मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या, तर शहरातील व्यापारी बांधवांनी संपुर्ण बाजार पेठ बंद ठेवून या निषेध मूक मोर्चा ला जाहीर पाठिंबा दिला होता.यावेळी विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनेचे कायरकर्त्यानी यश च्या खुणा बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आरोपीला तात्काळ अटक करून शिक्षेची मागणी केली. बसस्थानकपरीसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आरोपीचे सि डी आर रेकॉर्ड तपासून गुन्हेगारास अटक करावी, परमेश्वर मंदिर परिसरात पोलीस चौकी उभारावी शाळा, कॉलेज ,टिव्हीशेंन समोर पोलीस बंदोबस्त ठेववा अशे निवेदनात मागण्या करण्यात आल्या. या वेळी पोलीस स्टेशनमध्ये गोपाल रांजनकर डीवायएसपी भोकर व पिआय भगवान कांबळे यांना व डि,एन, गायकवाड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात उत्तम खंडुजी मिराशे ,माधव देवसरकर ,गणेश शिंदे ,प्रा.सुनील पतंगे ,डॉ.प्रकाश वानखेडे,विकास देवसरकर ,डॉ गफार, विठ्ठल ठाकरे ,अनवर खान ,गोविंद गोखले,लखन जाधव, प्रमोद बी राठोड,पाळजकर,राम सूर्यवंशी,गजानन हरडफकर ,सह हाजारोच्या सख्यंने समर्थक हजर होते.