दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पाथरी : परभणी जिल्ह्यातील पाथरी आगारातून विविध डेपो साठी सोडल्या जाणाऱ्या बसेस मधून सुमारे ४५० ज्येष्ठ नागरिकांनी (ज्यांचे वय ७५ वर्षे किंवा त्यावरील आहेत अशांनी) झिरो पैसे तिकीट घेऊन मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे वय ७५ किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशांनी झीरो पैशाचे तिकीट घेऊन राज्यात कुठेही चक्क मोफत प्रवास करण्याची मुभा दिली आहे. वर्षभरात एकूण ४००० कि.मी. मोफत प्रवास करता येईल अशी अट आहे.
राज्यात नुकतेच झालेले सत्तांतर आणि त्यानंतर पटापट घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांपैकी हा एक महत्त्वाचा व लोकहिताचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्याच निर्णयाचा फायदा राज्यभरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने घेत आहेत. एकट्या पाथरी आगारातून ४५० ज्येष्ठांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे तर मग राज्यभरातून किती जणांनी घेतला असावा ही बाब खरोखरच आनंददायी अशीच म्हणावी लागेल.