दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -राजेश गेडाम
भंडारा–पवनी पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.शिवशंकरजी मुंगाटे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या सुविधेसाठी पवनी तालुक्यातील अड्याळ येथे स्वर्गरथाचे सोमवार दि. २९ ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे एकत्रित औचित्य साधून मा.सौ. शुभांगी सुनिलजी मेंढे यांच्याहस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरणही करण्यात आले. सोबतच परिसरातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांत साथीच्या आजारांपासून वाचविण्याकरीता आरोग्याची तपासणी करता यावी, यासाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मा. सौ. शुभांगी सुनीलजी मेंढे यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी सौ. मेंढे यांनी शिवशंकर मुंगाटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
अड्याळ येथील गणेश सभागृहात आज झालेल्या या शिबिरात शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवित आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे भंडारा जिल्हाध्यक्ष मा. शिवरामजी गिऱ्हेपुंजे, जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. सुवर्णाताई मुंगाटे, भाजपाचे पवनी तालुकाध्यक्ष मोहनजी सुरकर, जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मा. संजयजी आजबले, सामाजिक कार्यकर्त्या मा. सौ. ताराबाई कुंभलकर, पवनी पंचायत समितीचे सदस्य मा. प्रमोदजी मेंढे, भारतीय जनता युवा मोर्चाचे पवनी तालुकाध्यक्ष मा. अमोलजी उराडे, मा. सोहेलजी खान, मा. राहूलजी खोब्रागडे आदी उपस्थित होते. शिवशंकर मुंगाटे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित हा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झाला.