दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
लोहा : लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ.श्यामसुंदर शिंदे यांचे पुतणे ॲड.रविराज रावसाहेब पा.शिंदे आज मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय अवघे 30 वर्ष होते.ॲड.रविराज रावसाहेब पा.शिंदे हळदेकर हे गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत हायकोर्टात वकिली करत होते.आ.श्यामसुंदर शिंदे यांचे बंधू स्व.रावसाहेब शिंदे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते.आज मुंबईत ॲड. रविराज शिंदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.ॲड. रविराज शिंदे यांचे पार्थिव मुंबईहून नांदेड येथे एअर ॲम्बुलन्स ने सायंकाळ 5.30 वाजता आणण्यात आले.त्यानंतर अंतिमदर्शनासाठी हाळदा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. सायंकाळी 6.30 वाजता त्यांच्या मूळ गावी हाळदा येथे शोकाकुल वातावरणात ॲड. रविराज शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ,काका,काकू असा मोठा परिवार आहे .ॲड. रविराज शिंदे यांचे वडील रावसाहेब शिंदे यांचे गतवर्षीच निधन झाले होते . शिंदे कुटुंबात एकाच वर्षात दोन आघात झाले आहेत. त्यामुळे शिंदे परिवारावर व हाळदा परिसरावर शोककळा पसरली आहे.