दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
कोकण वासीय जरी मुंबई ची वाट धरली तरी हि आपल्या जन्मभूमीचे गावपण कधीच विसरत नाही किंवा त्यांच्या अंगात शहराचा लवलेश पना ही राहत नाही जरी शहरात वास्तव्यासाठी असले तरी आपल्या गावाच्या विकासासाठी, सामाजिक प्रगती साठी सतत धावून येणारी हि धडपडी मंडळी कोकणातच नाही तर उभ्या देशात आढळणारी नाही. आपलं गाव आदर्श गाव निर्माण करण्याचा बहुमान पटकावला आहे असे उदगार मा खासदार सुनील तटकरे यांनी फळसप या गावात शासनाच्या मंजूर करण्यात आलेल निधीतून . संरक्षण भीत, अंतर्गत रस्ते, साकव बांधकाम कामाच्या उदघाटना प्रसंगी व्यक्त केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दाजी विचारे, माजी प. स. सभापती श्री महादेव पाटील, ता. अध्यक्ष समीर बनकर, महेश शिर्के, उप नगराध्यक्ष सुनील शेडगे, उज्वला सावंत, महिला अध्यक्ष, सोनल घोले सरपंच श्री सचिन विचारे, ट्रस्ट अध्यक्ष विजय विचारे किरण पालांडे सरपंच फारुख हाजवणे इ. मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते