दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पिंजाळ(वंगणपाडा) मंडळाचा आकर्षक देखावा
जव्हार:- सध्या राज्यात गणेशोत्सवाची धुमधाम चालू असून ग्रामीण भागात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या पारंपारिक पद्धतीने श्री गणरायाच्या मखरांची,देखाव्यांची निर्मिती केली आहे.या देखाव्यांच्या माध्यमातून गणेश भक्त आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे.ग्रामीण भाग असलेल्या वाडा तालुक्यातील श्री गणेश युवा मित्र मंडळाने (वंगणपाडा,पिंजाळ) यावर्षी आकर्षित किल्ले रायगडाची प्रतिकृती साकारून त्यामध्ये श्री गणरायाची प्रतिष्ठापना केलीआहे.
सामाजिक संदेश देणारी किल्ला संवर्धन मखराची निर्मिती केल्याने तसेच किल्ले रायगडची प्रतिकृती साकारल्याने ग्रामीण भागातील पिंजाळ गणेशोत्सव मंडळ हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य किल्ल्याचे पवित्र जपावे या मागचा उद्देश असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.मंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने मंडळाचे यंदाचे अठरावे वर्ष असून मंडळाला सचिन पराड यांच्याकडून श्री गणरायाच्या मूर्तीची उपलब्धता करून देण्यात आली आहे.