दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका
चंद्रपूर जिल्ह्यातील आंध्र प्रदेशच्या टोकावर असलेला तालुका कोरपना पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस वाहतूक नियंत्रण करीत असताना अचानकपणे बिना नंबर प्लेट ची गाडी दिसून आली, आणि त्या गाडीचा पाटला करत कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हाळगाव फाटा येते वाहनांना थांबवत झडती घेतली असता, त्या वाहनात प्रतिबंधिक सुगंधित तंबाखूचा मोठा साठा दिसून आला यात जप्त केलेल्या सुगंधी तंबाखू व माल वाहतुकीसाठी वापरलेले वाहन महिंद्रा जितो पिकअप क्र एम .एच .२९बी .डी.०५०६ किंमत ४०.०० रू असा एकुन किंमत १,०९,७७० वाहन व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले असून आरोपी(१) आकाश चंदू लबाने व्यवसाय चालक (2) अर्जुन कवडू येटे व्यवसाय मजुरी हे दोघेही राहणार वडजापुर ता वणी जि. यवतमाळ यांच्या विरोधात भादंवी ३२८ २७२ २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस हवालदार प्रभाकर जाधव पोलीस नाईक नामदेव पवार पोलीस शिपाई बलविंद सिंग यादव चमूने केली, पुढील तपास कोरपण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे करीत आहे.