दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा तरुणांचा जीव गेला आहे. रुग्णवाहिका आणि बाईक यांची जोरदार धडक झाली. समोरसमोरच झालेल्या भीषण धडकेत दोघा तरुणाचा जागच्या जागी मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते. पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळ हा भीषण अपघात झाला. गेल्या २४ तासांत झालेल्या दोन अपघातामध्ये चार तरुणांनी जीव गमावला आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातातही दोघा बाईकस्वार तरुणांचा मृ्त्यू झाला होता. आता पुणे-नाशिक हायवेवरही भीषण अपघातात आणखी दोघा तरुणांनी जीव गमावलाय.
राजगुरुनगर जवळील शासकीय विश्रामगृहाजवळ हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचं वय अवघं २३ वर्ष होतं. आतिश नंदकिशोर सोमवंशी आणि मयूर अशोक पवळे अशी अपघातातील मृत तरुणांची नावं आहेत. आतिश आणि मयूर हे दोघेही दुचाकीवर होते. त्यावेळी दुचाकी आणि रुग्णवाहिकेची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत जबर जखमी झालेल्या दोघेही मृत्यू पावले.