दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी-नामदेव तौर
परतूर : शनिवार ३ सप्टेंबर रोजी परतूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील गटशिक्षणाधिकारी कार्यालय आयोजित 49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले
डॉ. ए. पी. जे कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष महेश आकात हस्ते करण्यांत आले.
यावेळी गटसमनव्यक बागल सर यांनी मुलाना मार्गदर्शन केले
संस्थेचे अध्यक्ष महेश आकात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणले डॉ.ए.पी.जे.सरांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा आपल्या देशाकरिता मोलाचे असे कार्य त्यांनी करून ठेवले आहे त्या मार्गावर विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करणे आवश्यक आहे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे त्याच बरोबर डॉ.ए. पी.जे.सरांच्या अग्निपंख या पुस्तकाचा उल्लेख करताना सांगितले ते प्रत्येकाने वाचले पाहिजे आणि आपल्याकडे संग्रही ठेवावे असे पुस्तक म्हणून उल्लेख केला.
या स्पर्धेत प्राथमिक गटात 10 शाळांनी सहभाग नोंदवला तर माध्यमिक गटातून 12 शाळांचा सहभाग नोंदवला
प्रमुख उपस्थिती मध्ये गटशिक्षणाधिकारी संतोषजी साबळे, गटसमनव्यक कल्याणजी बागल, ज्ञानेश्वर सोळंके,डॉ.श्रीमती स्मिता रोडगे, विषय तज्ञ योगेश आवटे,विषय तज्ञ विठ्ठल पवार,दत्ता ठाकरे, काटमोडे रियाज शेख सय्यद सर,
यावेळी परीक्षक म्हणून रवींद्र लिपणे सर,सावंत सर, नाईक सर व जोशी सर,
तालुका विज्ञान समनव्यक श्री अशोक राठोड सर, यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले यांच्यासह
कर्मयोगी निवासी गुरुकुलचे अधिक्षक श्री गुंड सर,क्रिडाशिक्षक नवल सर,मुडें सर,मानवतकर सर,कातारे सर, सहभागी शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.