दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
यावर्षी गणेश उत्सव निर्बंधमुक्त साजरा होणार आहे, पण गावातील सौहार्दाचे वातावरणात बिघडणार नाही या बाबतीत दक्षता घेउन या वर्षीचा गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन संतोष तांबे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन लोहा यांनी दिनांक ३ ऑगस्ट रोजी शिवणी जामगा येथील गणेश मंडळ अध्यक्ष पदाधिकारी व गावातील नागरिक यांना शांतता समितीच्या बैठकीत केले, यावेळी पोलीस पाटील माधवराव जामगे, आप्पराव जामगे, पत्रकार गणपत जामगे, यांची उपस्थिती होती, यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक तांबे यांनी सांगितले की, गावातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थी यांना अभ्यासात अडथळा निर्माण होणार नाही अशा प्रकारे ध्वनी क्षेपक वाजवु नयेत, तसेच यावर्षी पण डि ,जे, वाजविण्यास परवानगी नाही, त्यामुळे कोणत्याही गणेश मंडळ यांनी डि जे वाजवू नयेत त्याएवजी पारंपरिक वाद्य बॉन्ड, सनई , डोल, वाजंत्री हे वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आपल्या गावातील शांतता अबाधित राहायला हवी याकरिता सर्व गणेश मंडळ, गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी सहकार्य करावे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या बाबतीत दक्षता शिवणी जामगा येथील गणेश मंडळ पदाधिकारी व गावकरी मंडळी यांनी घ्यावी, तसेच विसर्जन मिरवणुकीत शक्यतो लहान मुलांना जाऊ देऊ नये याबाबत पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले आहे,