दैनिक चालु वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:-राम चिंतलवाड
सद्या महाराष्ट्र राज्यात धार्मिक हिंदू सणांपैकी गणेश उत्सव,मंगळा गौरीदेवी स्थापना,दुर्गाउत्सव असे सण लागोपाठ चालू आहेत.अशा पवित्र धार्मिक हिंदू सणांमध्ये दररोज सकाळी,संध्याकाळी नित्यनेमाने गणेश,मंगळागौरीच्यां मुर्तीसमोर आरती,भजन,कीर्तन प्रवचन,भागवत,रामायण,हरी विजय गायनवादन,वाचन सुरूअसताना अचानक विजपुरवठा महावितरण शहर कार्यालय हिमायतनगर कडुन वांरवार खंडित केला जातअसुन,
विद्युतपुरवठा कोणत्याही क्षणी रात्री – बेरात्री खंडित होतअसुन सध्या गणेशोत्सव असल्याने असे विद्युत पुरवठ्यात खंडित होऊ नये,यासाठी सहाय्यक कार्यकारीअभियंता महावितरण उपविभाग कार्यालय हिमायतनगरला भाजपाकडून निवेदन देण्यातआले.त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्षआशिषभाऊ सकवान,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी,शहराध्यक्ष खंडू चव्हाण,जेष्ठ भाजप कार्यकर्ते कांतागुरु वाळके,युवा मोर्चा शहराध्यक्ष कल्याणसिंह ठाकुर,सेवा संचालक राम पाकलवाड,उपशहराध्यक्ष बालाजी ढोणे,सुभाष माने,अजय जाधव, लक्ष्मण चव्हाण,दुर्गेश मंडोजवार, वामनराव पाटील वडगावकर,अनिल माने,सचिन कोमावार,गंगाधर मिरजगावे सर,विनोद दुर्गेकर,ज्ञानेश्र्वर कोरडे यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.