दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
श्रीमती गंगाबाई प्राथमिक शाळेत गणेश उत्सव व शिक्षक दिनाचे औचित्य साधून दररोज विविध स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात येत आहेत. आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी चित्र रंगवा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . यावेळी विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन उत्फुर्स प्रतिसाद दिला .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मागदुमिया उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री मंजूर सर,श्रीमती गंगाबाई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सर होते .
तसेच या स्पर्धेचे आयोजन बी.एम केंद्रे ,श्रीमती एम.एस केंद्रे,श्रीमती एस.जी.शेंडगे,चव्हाण व्ही.डी,संतोष कांबळे सर,राठोड सर ,गोटमवाड सर ,बैनवाड मॅडम यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कठीण मेहनत घेतली.