दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी -माणिक सूर्यवंशी.
गुरु शिष्याची परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण पवित्र भाग आहे जीवनात आई-वडिलांची जागा कोणी ही भरू शकत नाहीत. आम्हाला सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील आमचे पहिले गुरू आई वडील हे असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे जाण्या साठी पेरीत करीत असतात . कधी आणि का केला जातो शिक्षक दिन साजरा. दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकाप्रती सन्मान प्रकट करणारा दिवस साजरा केला जातो. गुरु याचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्याचे एक विशिष्ट स्थान आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवून असून एक महान दर्शनिक शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी देशात भारत सरकार द्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मान केला जाते. शिक्षकाच्या हातात देशाचे भवितव्य असते. कारण शिक्षकांमुळे भविष्यातील डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक पत्रकार शास्त्रज्ञ विचारवंत. उत्तम शिक्षक. प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे सामर्थ वाण पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकाय मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक म्हणून ओळखले जाते. आपले विचार आपले व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा आहे. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभ उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्व समजून सांगण्यासाठी शिक्षकांप्रती
प्रेम व्यक्त करण्यासाठी हा शिक्षक दिवस साजरा केला जातो. आज शिक्षणाचा बाजार झाला असून ज्ञानाची बोली लावली जाते. वर्तमानात गुरु शिष्य परंपरा कलकित होत आहे. शिक्षकां द्वारे
विद्यार्थ्यांशी तर विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांसोबत दुव्य व्यवहार होत असल्याचा बातम्या येत असतात. हे बघून आमच्या संस्कृतीची अमूल्य गुरु शिष्य परंपरेवर प्रश्न मांडण्यात येतात. विद्यार्थीआणि शिक्षक हे दोघांचे दायित्व आहे की या महान परंपरेला उत्तम रित्या समजून समाज निर्माणात सहयोग प्रदान करावे.
शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी.
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे
शिक्षक
शिक्षक दिनाच्या सर्व माझ्या गुरूंना शिक्षक दिनानिमित्त ज्यांनी मला शिक्षण क्षेत्रामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या सर्व शिक्षकांना व गुरूंना व प्राध्यापक
यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रा. भीमराव दिपके (युवा व्याख्याता तथा पत्रकार देगलूर)