दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी- अंगद कांबळे
म्हसळा मधील रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा खरसई मराठी या शाळेचे प्राथमिक व उपक्रमशील, विध्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित असलेले श्री जयसिंग शंकर बेटकर यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन अविष्कार फाऊंडेशनच्या रायगड जिल्हा शाखेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती फाउंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार व रायगड जिल्हा कार्याध्यक्ष तथा निवड समितीने सदस्य श्री.शंकर शिंदे गुरुजी यांनी दिली या पुरस्काराचे वितरण रविवार दि २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कुलकर्णी भाई बिरादल हॉल उपजिल्हा रुग्णालयजवल तालुका श्रीवर्धन या ठिकाणी करण्यात येणार आहे. जयसिंग शंकर बेटकर यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य म्हसळा तालुक्यात खूप चांगले आहे भापट या आपल्या गावी सानेगुरुजी वाचनालय सुरु करुन खेड्यातील मुलांना पुस्तकचा व वाचनाचा लळा लागावा हा मुख्य उद्देश आहे. कोरोनाच्या काळा मध्ये उल्लेखनीय कार्य करून अनेक समाज सेवी संस्थांकडून ग्रामस्थांना अन्नधान्य आरोग्य विषयी सुविधा पुरवल्या आहेत अनेक संस्थेशी त्यांनाची जवळीक आहे व पदावर ही अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत आता पर्यंत अनेक सामाजिक संस्थेने त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचं गुणगौरव केलेला आहे.
उपक्रमशील शिक्षक बेटकर सर यांना पुरस्कार जाहीर होताच सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.