दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी-प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
( ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब , भु.द.वाडीकर ,अनिल कसबे , शिवानंद टाकसाळे कविता जोशी , डॉ. नितीन जोशी, नंदकुमार गादेवार पुरस्काराचे मानकरी )
नांदेड – स्व. गंगाधररावजी पांपटवार जयंती महोत्सव समिती व टीचर्स क्लब रुग्णालय व स्व. गंगाधररावजी पांपटवार वैद्यकीय सह संस्था मर्यादित नांदेड तालुका जिल्हा नांदेड या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने नांदेड येथील कुसुम सभागृहात 16 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी ठीक 5 : 00 वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर माधवराव पाटील शेळगावकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहणार आहेत या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सन्मानाने गौरव करण्यात आलेले माजी खासदार व आमदार ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब , भू.द.वाडीकर , अनिल कसबे शिवानंद टाकसाळे , कविता जोशी , नंदकुमार गादेवार , डॉ. नितीन जोशी या सात मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करुन गौरव केला जाणार आहे तर रवी लोहाळे व निर्मल कुमार सूर्यवंशी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष माननीय गजाननराव पांपटवार , सहयोगी डी.बी. जांभरुणकर आणि डॉ.राम वाघमारे यांनी दिली.
स्वर्गीय गंगाधरराव पांपटवार यांचे शैक्षणिक , सामाजिक व आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान होते. सामान्य लोकाप्रतीनिष्ठा ठेवून त्यांनी आपल्या आयुष्यात आयुष्यभर सेवा कार्याला झोकुन दिले होते. त्यांच्या या कार्यकर्तुत्वाचे स्मरण करण्यासाठी प्रतिवर्षी गंगाधरराव पांपटवार जयंती महोत्सव व टीचर्स क्लब रुग्णालय या सेवाभावी हॉस्पिटलच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
स्व. गंगाधररावजी पांपटवार जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष असून यावर्षी शैक्षणिक , सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ लोकनेते माजी खासदार व आमदार तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब, साहित्य क्षेत्रातील लेखक समीक्षक भु.द.वाडीकर , पत्रकारितेसाठी दैनिक देशोन्नती चे निवासी संपादक अनिल कसबे, प्रशासकीय क्षेत्रातील परभणी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे , कलाक्षेत्रात नांदेड येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या कला शिक्षिका कविता जोशी सामाजिक क्षेत्रात नंदकुमार गादेवार आरोग्य क्षेत्रात डॉ.नितीन जोशी यां दिग्गज मान्यवरांना स्व.गंगाधर रावजी पांपटवार जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे व त्यांचा गौरव करण्यात येणार आहे तसेच पोलीस नाईक रवी लोहाळे आणि प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष स्मरणिका प्रसिद्ध करण्यात येणार असून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या माननीय व्यक्तींच्या लघुपटाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान संयोजन समितीचे अध्यक्ष माननीय गजाननराव पांपटवार यांनी केले आहे.