दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
वाडीवस्तीत जन्मलेला
शिक्षणासाठी झटलेला
शहराला स्पर्शून
गावाकडे परतलेला
जन्मदात्यांना मानणारा
नात्यागोत्यात रमणारा
समाजासोबत राहून
पोरांसाठी झटणारा
संस्कृती सांभाळणारा
नीतीमूल्ये जगणारा
इतिहास शिकवितांना
भविष्य घडविणारा
पिढ्यांसाठी झिजणारा
झिजताना उजळणारा
क्षणाक्षणाने संपताना
कीर्तीरूपे उरणारा
विद्येचा उपासक
सदगुणांचा संग्राहक
सर्वोत्तम दिशादर्शक
जो आहे एक शिक्षक.
संजय रावसाहेब जाधव
शिवूर ,ता वैजापूर,
जि औरंगाबाद
मो.820 895 8805.