दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
वंचित बहुजन आघाडीची मागणी.कारवाई न झाल्यास जिल्हाभर रस्ता रोको.
भूम:-तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल यांच्या नेतृत्वाखाली भूम तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, सिंदफळ येथील मुलीवर अतीप्रसंगाची अमानुष घटना अतिशय संतापजनक व निंदनीय घडलेली आहे.गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा जरब नसल्याचे या घटनेवरून उघडकीस येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे. या घटनेची सत्यता पोलीस अधिक्षक यांनी तपासून जलदगतीने दोष आरोपपत्र दाखल करण्यासाठी पावले उचलावीत व पीडित कुटुंब यांना न्याय द्यावा. पीडित कुटुंबाच्या जीवितास संबंधित आरोपीकडून धोका आहे, त्या कुटुंबाचा संरक्षण द्यावे व ही घटना निंदनीय असून सरकारने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. नराधमास कडक शासन करावे,अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना मुसा शेख, महावीर बनसोडे, वैभव गायकवाड ,दीपक ईजगज, रोहित गायकवाड, आक्की गायकवाड,अजित शिंदे, सचिन शिंदे, जाहीर शेख,अनिकेत थोरात ,रोहित जानराव ,कृष्णा सानप, माजी नगराध्यक्ष संजय शिंदे छकुल सरवदे निवेदनावर स्वाक्षरी आहेत.