दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी-
परभणी : ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष श्री. राजकुमार हट्टेकर यांनी श्री. कराळे यांचे निवासस्थानी “श्री गौरी-गणपतीं”चे दर्शन घेतले.
श्री. हट्टेकर हे “श्रमिक एकजूट” या मराठी दैनिकाचे परभणी जिल्हा आवृत्तीचे संपादक म्हणून मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.
श्री. हट्टेकर हे उच्चविद्याविभूषित असून ते मनमिळाऊ, सालस स्वभावाचेही आहेत. ते पत्रकारितेतील गाढे अभ्यासक म्हणून सर्वपरिचित आहेत. सामाजिक व भौगोलिक अभ्यासाचे पारंगत असलेले श्री. हट्टेकर हे फावल्या वेळेत विद्यार्जनाचे पवित्र काम करीत असतात. श्री गौरी-गणपती दर्शनाच्या निमित्ताने प्रथमतः आमच्या निवासस्थानी श्री. हट्टेकर यांची उपस्थिती लाभली गेल्याने वातावरण आनंददायी असेच झाले. या औचित्यावर त्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.