दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी धाड सर्कल -सलमान नसीम अत्तार
धाड सर्कल.
दोषींवर कारवाई करण्यात उशीर का प्रशासनाला सवाल. दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन.
शिवसेना पक्ष प्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांनी नुकत्याच बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे. प्रशासनाने हल्ला प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे व कठोर शासन करण्याचे आश्वासित केले होते. परंतु पोलिस प्रशासनाने दबावापोटी दोषींवर कडक कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. आज दिनांक ५/९/२०२२ रोजी दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी यांना *शिवसेना जिल्हा प्रमुख मा जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. तसेच यानंतरही असा प्रकार घडल्यास जशास तसे उत्तर मिळेल. यातून जो काही अनुचित प्रकार घडेल त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी उप जिल्हा प्रमुख संजय हाडे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, वैद्यकीय आघाडी तालुका प्रमुख डॉ अरुण पोफळे, युवासेना तालुका प्रमुख निलेश राठोड, अल्पसंख्याक आ जि. प्र सय्यद इक्बाल, सचिन परांडे, एकनाथ कोरडे, सुधाकर आघाव, विजय इतवारे, जगदीश मानवतकर, मोहन राजपूत, सतीश राजपूत, प्रवीण सोनवणे, गणेश श्रीवास्तव, विजय राजपूत, विनोद गायकवाड, नितीन लोंढेकर, रामेश्वर बुधवत, अरुण बावणे, उमेश सोनवणे, मंगेश इंगळे, गजानन भिंगारे, प्रफुल जायभाये, रवी काकडे, किरण दराडे, राहुल जाधव, जितेंद्र भाकरे, सतीश जंजाळ, शेषराव सावळे, संभाजी देशमुख, मधुकर महाले, मधुकर सिनकर, किसन पवार, किशोर कानडजे यांची उपस्थिती होती.