दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
सेवानिवृत्त न.पा. कार्यालयीन अधीक्षक बाबुराव केंद्रे यांचा लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
लोहा न.पा.चे माजी कार्यालयीन अधीक्षक बाबुराव केंद्रे यांनी लोहा न.पा.त तब्बल २७ वर्ष उत्कृष्ट सेवा करुन त्यांची धर्माबाद न.पा.त पाच वर्षांपूर्वी कार्यालयीन अधीक्षक म्हणून प्रशासकीय बदली झाली होती व धर्माबाद न.पा.त ही कार्यालयीन अधीक्षक या पदावर बदली झाली होती व तेथे त्यांनी सलग ५ वर्ष कार्यालयीन अधीक्षक म्हणून सेवा बजावली व ते नुकतेच निसर्गाच्या नियमानुसार वयोमानाने वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यामुळे ते धर्माबाद न.पा.त कार्यालयीन अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले व ते आज आपल्या जन्मभूमीत लोहा येथे आले असता त्यांना लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी त्यांच्या देऊळगल्ली येथील वाड्यावर सत्कारासाठी निमंत्रण देऊन बाबुराव केंद्रे यांचा नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी शाल पुष्पहार घालून पेढा भरवून भव्य सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, सय्यद गौस आदी उपस्थित होते.