दैनिक चालू वार्ता कंधार तालुका ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज :- कंधार तालुक्यातील पेठवडज येथील श्री. छत्रपती शिवाजी गणेश मंडळ येथे दि. ८/०९/२०२२ रोज गुरुवारी रात्री ८ वाजता तुप पोळी च्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वाल्मिकी मंदिर परिसर श्री छत्रपती शिवाजी गणेश मंडळ पेठवडज व दानशूर अन्नदात्ते परमेश्वर धोंडीबा बकवाड (ग्रा.प.सदस्य) माधव मारोती होनवडजे (प्राध्यापक) मन्मंथ शेषेराव चिटकुलवार (शिक्षक) बालाजी व्यंकटी बंचेवाड (ग्रा.प.सदस्य) विजय सोनाजी गायकवाड या सर्व गणेश भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तेव्हा पेठवडज व परीसरातील गणेश भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी येऊन सहकार्य करावे असे आयोजक व गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य यांनी कळविले आहे.