दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:जळकोट शहरातील श्री गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकणा-या सुमित शिवाजी तेलंग याचा बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना दि६ सप्टेंबर रोजी मुखेड तालुक्यातील हिप्परगा गावाजवळ घडली.मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील सुमित शिवाजी तेलंग हा विद्यार्थी जळकोट येथील श्री गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. दररोज तो दापका या गावावरून हिप्परगा मार्गे जळकोटला येत असे दि ६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास दुचाकीवरून कॉलेजसाठी येत होता परंतु हिप्परगा गावाजवळ मुखेडकडून येणा-या मुखेड-शिंंगणापूर या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये सुमितचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची बहीण किरकोळ जखमी
झाली. यावेळी घटनास्थळी मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोबाडे, गीते यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. जळकोट येथील श्री गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेबद्दल प्राचार्य दत्तात्रय हांम्पले यांनी दुख व्यक्त केले आहे.जळकोट-दापका दरम्यान पुलाची गरज
दापका राजा-जळकोट हे अंतर केवळ तीन किलोमीटर आहे परंतु दापका ते जळकोट दरम्यान एक नदी आहे. या नदीवर अनेक वर्षापासून पुल व्हावा, अशी मागणी प्रवासी तसेच शेतकरी करीत आहेत. दोन गावांना जोडणा-या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. हा रस्ता जर चांगला असता व नदीवर पूल असता तर सुमित हिप्परगा मार्गे न जाता तो सरळ जळकोट आला असता व अपघात झाला नसता.