दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
गणेशोत्सवानिमित्त व्यसनमुक्तीचा संकल्प करून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन नांदेड येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ तथा व्यसनमुक्ती उपचार विशेष तज्ञ डॉ. प्रणद जोशी यांनी पिंपळगाव (येवला) येथील गणेश भक्तांना व ग्रामस्थांना संबोधित केले.
यावेळी व्यासपिठावरप्रमुख उपस्थिती कोल्हे (मॅनेजर जोशी हॉस्पिटल व स्वानंद व्यसनमुक्ती केंद्र), बालाजी जाधव (सल्लागार),रवि लिंबोटकर (फार्मासिस्ट),सरपंच दयानंद येवले यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ.प्रणद जोशी म्हणाले कि,समाजात तंबाखू चे, दारू चे,सिंधीचे व्यसन असून अनेकांना कैन्सर होत असून युवा पिढी व्यसनाधीनतेमुळे वाया जात आज खरी समाजप्रबोधनाची गरज असून नवयुवकांनी व्यसनापासून दूर राहिल पाहिजे.व्यसनामुळे शारिरीक व आर्थिक समस्या निर्माण होते.लहान मुलांनी वगैरे व्यसनापासून दुर ठेवावे, सर्वांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा.जर कुणाला तंबाखू,बिडी,गांजा,सिगारेट चे व्यसन असेल त्यांना माझ्याकडून सर्व बाबतीत सहकार्य मिळेल, कोणत्याही भीती न बाळगता माझ्याशी संपर्क करावा मी समाजाकरिता वाटेल ते करायला तयार असल्याचे ही ते म्हणाले.
यावेळी तरुणांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ.जोशी यांच्या समाजप्रबोधन पर विचारांनी सर्वजण मंत्रमुग्ध झाले. गावकऱ्यांनी व्यसनमुक्ती चा विडा उचलला. डॉ.प्रणद जोशी हे हजारो, लाखो लोकांना नेहमीच व्यसन निर्मूलनाचा संदेश देत समाज प्रबोधनाचे धडे देत असल्यामुळे कित्येक जीवांचे बळी न जाता अनेकांना जीवनदान मिळत असल्याचे ऐकून गावकरी आनंदीत झाले. यावेळी कार्यक्रमास सरपंच दयानंद येवले,मारोती तोंडचिरे, भगवान येवले,बाबुराव बळवणे , शंकर येवले,राजु येवले, माधव येवले,सह गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला व पंचक्रोशीतील नागरिक,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पिंपळगाव (येवला) यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सरपंच दयानंद येवले यांनी तर आभार रवि लिंबोटकर यांनी मानले.