दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-तालुक्यातील भवानवाडी येथील जय महाकाल तरुण गणेश मंडळाने स्थापना केलेल्या गणरायाची आरती विकासरत्न संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव पारंपारिक वाद्य हालगीच्या तालावर संजय गाढवे यांनी लेझीमचा ठेका धरला. यावेळी मधुकर अर्जुन,खंडेराव गोयकर,लहू अर्जुन,सुनील थोरात यांच्यासह गावातील महिला,जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.