दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर :
देगलूर शहरातील नगरपरिषद अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभारण्यात आली. शहरातील आजी व माजी लोकप्रतिनिधींच्या मदतीने हे सर्व यशस्वी झाले महाराष्ट्रात नाही अशी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आली. मात्र शैक्षणिक दवाखाना तर उघडला मात्र योग्य औषधी देणारा डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार सध्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची आहे. अभ्यासिकेत विद्यार्थी अभ्यास तर करीत आहेत मात्र त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक उपलब्ध नसल्याची खंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर कार्याध्यक्ष हबीब रहेमान यांनी व्यक्त केली.
मोठमोठ्या शहरात जाऊन अवास्तव खर्च करणे सध्या देगलूर वासियांना शक्य नाही व तसेच पुण्यातील नामांकित शिक्षक सध्या आपल्या देगलूर शहरात उपलब्ध आहेत. त्यांची जर नियुक्ती मार्गदर्शक शिक्षक म्हणून केल्यास होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना बाहेर स्पर्धा परीक्षा करण्यासाठी जाण्याची गरज नाही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांना खूप मोठे सहकार्य लाभेल म्हणून लवकरात लवकर अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अशा स्वरूपाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर कार्याध्यक्ष हबीब रहेमान यांच्याकडून देण्यात आले आहे.