दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-पार्डी फाटा ते खर्डा रस्त्याचे (राज्य महामार्ग क्र 57) काम चालु आहे . सदरील काम हे महाराष्ट्र शासनाच्या निविदे व मंजूर अभियंता अहवाला प्रमाणे होत नसल्याप्रकरणी या कामाची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली गेली आहे. तसेच शासनाच्या निविदे प्रमाणे काम न झाल्यास हजारो कार्यकर्त्यांसह रस्ता रोको करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना युवा समाजसेवक राजाभाऊ माने यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देते वेळी युवा समाजसेवक राजाभाऊ माने , पंचायत समिती सदस्य रमेश पाटिल , तानाजी गाढवे, अमोल सुरवसे, संतोष सुपेकर, संतोष जाधव, साद शेख, बाळू माने, आयाज शेख, दत्ता रेपाळ, बालाजी गाडे, प्रवीण हाके, शहाणवाज पिरजादे उपस्थित होते.