दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी- राम चिंतलवाड
दि.0८/0९/२०२२रोजी तहसील कार्यालय हिमायतनगर येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांची एक महत्वपूर्ण बैठक मा.उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी श्री.ब्रिजेश पाटील हदगाव यांच्याअध्यक्षतेखाली घेण्यात आली.यामध्ये मौजे सिरपल्ली-शेलोडा यादी भाग क्रमांक -58 येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ श्री जालने डी.एच.सहशिक्षक यांनी मतदान कार्डला आधारकार्ड जोडण्याचे काम हदगांव हिमायतनगर तालुक्यातून सर्वात जास्त केल्याबद्दल श्री ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यातआलाआहे.या प्रसंगी हिमायतनगर तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री डी.एन. गायकवाड,नायब तहसीलदार श्री सूर्यकांत ताडेवाड,चंदुसिंग राठोड,डाटा इंट्री ऑपरेटर रवी हाटेसह हिमायतनगर तालुक्यातील सर्व बीएलओ उपस्थित होते.हा सत्कार झाल्यांमुळे त्यांच्या सहकाऱ्यांकडुन,मित्रपरिवार, नातेवाईकमंडळी,वरिष्ठांकडून अभिनंदन केले जातआहे.