दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी-अंगद कांबळे
मु. पो.रहाटाड ता. तळा जी. रायगड येथील कै. हरिभाऊ धर्मा पाटील हे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य हे नाव हयात असताना मु.रहाटाड कोळी समाज प्रमुख म्हणून समाजाचे नेतृत्व करताना त्यांनी श्री गोपाळ कृष्ण भजन व नाट्य मंडळाची स्थापना करून कला क्षेत्रात नाव लौकिक मिळवले आणि अनेक गुणी कलावंत निर्माण केले ग्रंथवाचन, निरूपण, तबला, सनई, गायन, समाज सेवक, राजकीय हस्तीशी जवळीक असे उतुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे श्री हरीभाऊ यांचा समाजमय संगीतमय कार्याचा 1981 मध्ये शेवट झाला त्यांची स्मृती त्यांचे नातू सन्मा.खेळाराम कृ. पाटील या वर्षी गणेशउस्तवात ” जीवनगाथा “हा संगीतमय कार्यक्रम मु राहाटाड येथे राधाकृष्ण मंदिरा समोर सुंदर असे रंगमंच तयार करून संपन्न केला राहत्या भवनास आजोबांचे नावं देवून ऋण व्यक्त केले या कर्यक्रमास त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास वाद्यवृंदाने उत्तम संगीत सादर केले मा. श्री रामचंद्र पिसे मा श्री गोविंद बसवत मा. श्री विठोबा चां.कंबू. बुवा ( रायगड भूषण )लक्ष्मण धमरी कु.अवंतिका गो. बसवत श्री मारेश्वर लाशे बुवा मा श्री गोविंद खुटीकर, तुकाराम पां.भगत, विठोबा धुमाळ, एखनाथ तु. घागरुम, सुरेश स.लाशे. या सर्व मान्यवराने कै. हरिभाऊ यांच्या जीवनावर गीते सादर करून सर्व उपस्थित रसिकांना मंत्रमुगंध केले.
म्हसळा तालुक्यातील खरसई गावचे श्री रामचंद्र म्हात्रे ( रायगड भूषण )यांनी आपल्या ओघवत्यावाणीने जणू हरिभाऊ पाटील यांचे संपूर्ण जीवन चरित्रच उभे केले.
या सर्व जीवनगाथा कार्यक्रमाचे उत्तम आयोजन श्री खेळाराम कृष्णा पाटील यांनी दृष्ट लागण्याजोगे करून सर्वांची वाहवा मिळवली असा नातू असावा असे जनतेच्या मुखातून उस्त्फुर्त बोल निघाले या जीवनगाथा कार्यक्रमास उपस्थित, आमंत्रित आणि कलावंतांना शाल, श्रीफळ, पुष्पगुछ आणि !! कलासन्मान !! हे स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास म्हसळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मा.श्री अंकुश गाणेकरजी आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास लाशे व मोरेश्वर लाशे यांनी केले हा कार्यक्रमास यशस्वी करण्या करीत संपूर्ण श्री गोपाळ कृष्ण भजनी मंडळ व नाच मंडळ यांनी श्री खेळाराम कृ. पाटील यांना सहकार्य केले
शब्दांकन. श्री रामचंद्र म्हात्रे बुवा खरसई ( रायगड भूषण )