दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
इंगळी येथील जय भवानी मंडळाचे गेली ३० वर्षापासून विविध स्वरूपाचे सामाजिक कला व संस्कृतीक क्षेत्रात मोठे योगदान आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्य चालू आहे.
प्रतेक वर्षी विविध सामाजिक विषयावर आधारीत नाटीका सादर करून समाज जागृतीच करतात.
या वर्षी खेळ चाले रातीचा हि अंधश्रधेवर आधारीत नाटीका सादर करून भूत ,बुवाबाजी यावर प्रकाश टाकण्याचे कार्य नाटीका मधून केले आहे.
शिवाय भव्य मिरवणूक काढून विविध राक्षस, महाकाली,जोतीबा दैवत,अस्वल,अशा हलत्या मुर्ती बणवून लोकांची मने जिंकली आहेत.
मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी,सजावट कलाकार गणी मुल्लाणी,बाळासो मर्दाने,सुरज कणीरे,विनोद मिठारी,दादा दानोळे,सागर कोळी,अनिल दानोळे,दिलीप पोतदार,विक्रम चौगुले,अमर माने व इतर मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले .आणि गणेव विसर्जन मोठ्या थाटामाटात बाप्पाला निरोप देणेत आला.