दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा. प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कळका :- कंधार तालुक्यातील कळका येथील सेवा सहकारी सोसायटी वर बिनविरोध भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात म्हणजेच नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व आ.डॉ.श्री. तुषारजी राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता मिळवली आहे. चेअरमनपदी श्री. व्यंकटराव गणपतराव पा.गायकवाड व व्हाॅ. चेअरमनपदी श्री. काशिनाथ बालाजी पा. गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून श्री. व्यंकट लक्ष्मणराव पा. गायकवाड, श्री. सुधाकर पा. गायकवाड, श्री. मधुकर पा. गायकवाड, श्री.शिवाजी पा. गायकवाड, श्री. गिरमाजी पा. गायकवाड, सौ. दरुबाई पा. गायकवाड, सौ. शोभाताई पाटील, कुमदळे गुरुजी, नारायण श्रीमंगले, विश्वंभर केंद्रे, दशरथ गादेकर यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती श्वेता जाधव मॅडम, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून श्री. आनंद चव्हाण साहेब व सचिव श्री. बी.टी. सोनटक्के साहेब यांनी बिनविरोध निवडणूकीसाठी काम केले. सर्वत्र खासदार साहेब व आमदार साहेब यांचे व त्यांच्या सर्व पॅनलचे अभिनंदन केले जात आहे. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गावकऱ्यांनी विजयी उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.