दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
चंद्रपूर
सोमवार दिनांक:- 12/09/2022 रोजी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा संयोजक सागर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली टेकडी विभागातील शहीद भगतसिंग विद्यालयाच्या प्रांगणात पाच शाळा सुरू आहेत. या पाच शाळांपैकी सकाळ चार व दुपारी एक शाळा सुरू आहे .तपासणी केली असता, इमारत पूर्णपणे जीर्ण आहे, वर्ग काबाळखाने आहेत, लाईट फॅनचा अभाव निदर्शनास आला आहे, शालेय जेवणही कधी कधी कच्चे तर तांदूळ अस्वच्छ बनवल्या जातात, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि सुविधा उपलब्ध नाहीत. दिव्यांगांसाठी सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, MJP नळाचे कनेक्शन नही, शाळेच्या मैदानात कचरा वाढलेला आहे, शिक्षकांची कमतरता असल्याने मुलांचे भविष्य धोक्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
निरीक्षण मोहीम राबविताना शहराध्यक्ष- रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली आणि गणेश सिलगमवार, सचिव ज्योती बाबरे , महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, CYSS शहर संयोजक शिरीन सिद्दीकी, युथ संयोजक सागर कांबळे, उपाध्यक्ष गगन सकिनाला , संघटन मंत्री अलविना शेख इत्यादी उपस्थिती होते.