दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांचे शांत, स्वयंमी सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे साताऱ्यांचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आज सायंकाळी पुण्यांतील जहाँगीर रुग्णालयांमध्ये आज सायंकाळी पाच वाजण्यांच्या सुमारांस त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ साली झाला. साहित्य कला क्रीडा संस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्षे शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली चांगलीच कारकीर्द गाजवली होती. सातारच्या राजघराण्यांतील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राज घराण्यांतील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला हे सातारकर कधीच विसरु शकत नाहीत. त्यांना खेळण्याविषयी प्रचंड आवड होती त्यामुळेच ते महाराष्ट्र राज्य बॅटमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे ते भाऊ होते तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते काका होते. अशा या सर्वसामान्याच्या लोकप्रिय राजांला म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना सातारा जिल्ह्यांसह महाराष्ट्र राज्यांतील सर्वच दैनिंक वृत्तपत्रांचे मुख्य कार्यकारी अधिकारी संपादक तसेच सर्व प्रतिनिधी यांच्यावतिने भावपूर्ण श्रद्धांजली.