दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोल्हापूर-संभाजी गोसावी
सध्या राज्यामध्ये गुटखा विक्रीला चांगलीच बंदी असताना तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये अवैध धंद्यांना चांगलाच उत असून. मात्र पोलीस प्रशासन सुद्धा चांगलेच सतर्क असल्यांचे दिसून येत आहे.अशीच एक प्रशासनीय कामगिरी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागांच्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. यामध्ये विनापरवाना कारसह गुटख्यांची वाहतूक करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. पुणे ते बेंगलोर या मार्गावर (पुलाची शिरोली ता. हातकणंगले) येथील बालेचंद पीर दरिया समोर चालक शोहेब बाबाजी देसाई (वय २२) रा. पुलाची शिरोली) याला पोलिसांनी ताब्यांत घेवुन त्याच्याकडे विचारपूस करीत असताना पोलीस तपासांमध्ये तो अवैध विनापरवा गुटक्यांची व सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल घेवुन आपल्या गाडीसह वाहतूक करीत होता. गोपनीय माहितीच्या आधारे कोल्हापूर स्थानिक अन्वेषण विभागांच्या पथकांने सापळा रचून त्यांस ताब्यांत घेतले. सदरच्या कारवाईमध्ये जवळपास सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत पोलिसांना यश आले सदरची कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यांत आली. सदरची कारवाई कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मा. शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक मा.तिरुपती काकडे, मा.पोलीस निरीक्षक संजय गोलें यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागांतील पोलीस कृष्णांत पिंगळे ,बालाजी पाटील रणजीत पाटील,रवींद्र कांबळे व आयुष गडकरी आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.