दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी- प्रा अंगद कांबळे
सामाजिक बंधन पाळत सर्वस्वी समाजाला वाहून घेणारे दुसऱ्याच्या पिढा, वेदना आपल्या स्वतःच्या आहेत असे समजून इमाने – इतबारे सेवा करणारे दुसऱ्याच्या चेहऱ्यावावर समाधान बघणारे देवदूत म्हणून सेवाकारणारे समर्थ सोशल फाउंडेशन , न्यूट्रीफील हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र व जनरल हॉस्पिटल यांच्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त अभियानामध्ये भाग घेऊन अनेक लोकांना व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त केल्याबद्दल राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार – २०२२. चा डॉ. प्रज्वल बागुल सर यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक माननीय सादिक शेख व शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक माननीय सागर देसाई संस्थेचे संचालक असलम शेख , सुहास पाटील संस्थेचे सर्व विस्तार अधिकारी व सभासद उपस्थित होते. समर्थ सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्याची माहिती संस्थेचे संस्थापक श्री सादिक शेख यांनी दिली. शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राची माहिती श्री सागर देसाई यांनी दिली. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री विशाल जाधव साहेब युवा उद्योगपती शिव समर्थ असोसिएट्स चे मॅनेजिंग डायरेक्टर, सहाय्यक संचालक वित्त विभाग मंत्रालय मुंबई श्री अतुल आकुर्डे साहेब, मोटार वाहन निरीक्षक (RTO)
श्री संदीप गडकर साहेब, उपस्थित होते.