दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पालम तालुक्यातील शेखराजूर प्राथमिक शाळेस “आदर्श पुरस्कार” मिळाला आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रा. पं. व ग्रामस्थांकडून शाळेला आदर्शत्वाचा सन्मान मिळवून देणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला गेला आहे. सदर शाळेने केलेल्या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणजेच हा पुरस्कार होय.
शिवसेना नेते भास्कर जाधव
परभणी दौऱ्यावर
“”””””””””””””””””“””””””””””””””””””””””
शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव हे परभणीच्या दौऱ्यावर आले आहेत. खा. संजय जाधव यांच्या निवासस्थानी आ. जाधव यांनी भेट दिली आहे. आपल्या भेटीत त्यांनी संघटनात्मक व बांधणी बाबतच्या काही महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली असावी. यावेळी त्यांनी आ. डॉ. राहूल पाटील यांचीही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
मनपाची दंडात्मक कारवाई
“””””””””””””””””””””””””””””””””'”‘
परभणी महापालिका क्षेत्रांतर्गतच्या काही व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिक कॅरी बॅगचा सर्रासपणे वापर केल्यामुळे मनपा आयुक्त प्रिती सांडभोर यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. रुपये ५० हजारांची दंडात्मक कारवाई केली असल्याने व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाली आहे.
बालविवाह निर्मूलनासाठी
एकदिवसीय कार्यशाळा
“””””””””””””””””””””””””””””””””””””
जिल्हाभरात कोठेही होऊ घातलेले बालविवाह रोखून त्यांचे कायमस्वरुपी निर्मूलन केले जावे यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणीतील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकांची एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. बालविवाह रोखणे किंबहुना त्यांचे उच्चाटन करणे ही काळाची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
शेअर मार्केटचे अमिष;
साडेचार लाखांची लूट
“”””””””'””””””””“”””””””””””'””””””””””‘
पोलिसांत गुन्हा दाखल
पंढरीनाथ माणिकराव डोंबे नावाची व्यक्ती एका बॅंकेत नोकरीला आहेत. त्यांना अरुण नावाच्या अनोळखी फोन करुन शेअर मार्केट मधून बोलत असल्याचे सांगितले. भविष्यात ट्रेडींगद्वारा दरमहा २० लाख रुपयांची कमाई करता येईल असे आमिष त्याने डोंबे यांना कथन करत येणकेन प्रकारे पटवले.
त्यानंतर त्याने रुपये ७५ हजार रोख व पुराव्यासाठी कागद पत्रांची पूर्तता करण्यास सांगितले, ते सर्वडोंबे यांनी कथित अरुणाला दिलेही. कांही दिवसांनी त्याच अरुणने तुमचे काम झाले असून १८ टक्के रक्कम भरणा करावयाची असून ती तात्काळ घेऊन येण्याचे फर्मान सोडले. ती रक्कम भरणा केल्यानंतर डोंबे यांनी पुन्हा कथित शेअर मार्केट व्यक्तीला फोन केला. परंतु त्याने फोन न उचलल्यामुळे डोंबे यांना आपण फसले गेल्याची पूर्ण खात्री झाली. त्यांनी तात्काळ नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा कथित केली. पोलिसांनी त्या बनावट व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.