दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जयंतीदिन देशभरात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. भुम येथील
सार्वजनिक बांधकाम उपविभाग भूम येथे अभियंता दिना निमित्त स्थापत्य अभियंता सौ.एस.एन.हजारे(खुणे) यांचा भूम तालुका कांँग्रेस कमिटी च्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष विलास काका शाळू, तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे,जिल्हा युवक कांँग्रेस उपाध्यक्ष अमर तागडे,विधानसभा युवक कांँग्रेस अध्यक्ष दत्ता तांबे,परंडा विधानसभा युवक कांँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद अँड.वेताळ साहेब,क्लार्क हजारे साहेब उपस्थित होते.