दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल प्रकल्प विषयी अधिकारी माहिती देताना
भूम:– स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था आणि हिंदुस्तान युनिलिव्हर फाऊंडेशन च्या विद्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये व भूम तालुक्यातील ५० गावांमध्ये मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल हा प्रकल्प राबविला जात आहे.प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती व शाश्वत पाण्याची उपलब्धता होईल यासाठी पाण्याचे संवर्धन या विषयी क्लस्टर लेव्हल ला ५ दिवस ५ गावात दि ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या पाच दिवसात हाडोंग्री, घाटनांदूर, बावी, वालवड आणि माणकेश्वर या पाच गावांमध्ये कार्यशाळा घेण्यात आल्या. दर दिवशी १० गावातील प्रत्येकी १० शेतकरी (महिला आणि पुरुष) यांची पाणी व शेती माहिती कार्यशाळा घेण्यात आल्या. यामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व तसेच रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, सेंद्रिय शेती कशी करावी त्या सोबतच पाण्याचे संवर्धन या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ट्रेनर व मेंटर वैशालीताई घुगे, तालुका समन्वयक मधुरा गायकवाड , नम्रता म्हेत्रे तसेच सखी मोठ्या संख्येने शेतकरी महिला उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सदरील गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.